मुंबई – ‘आदरणीय शिंदे साहेब आपणास गरज पडल्यास माझा पक्ष माझ्या पक्षाचे चिन्ह spanner (पाना) आपल्या सोबत उभा राहील.. आपण युवा स्वाभिमान पार्टी आणि पाना चिन्ह घ्यावा’ असं ट्विट करत अमरावती लोकसभा मतदार संघात नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठी आर दिली आहे.
आदरणीय शिंदे साहेब आपणास गरज पडल्यास माझा पक्ष माझ्या पक्षाचे चिन्ह spanner (पाना) आपल्या सोबत उभा राहील.. आपण युवा स्वाभिमान पार्टी आणि पाना चिन्ह घ्यावा …@mieknathshinde
— MLA Ravi Rana (@mlaravirana_ysp) October 8, 2022
दरम्यान, शिवसेना आमचीच असा दावा करत एकमेकांविरोधात उभ्या ठाकलेल्या ठाकरे आणि शिंदे गटांना निवडणूक आयोगाच्या अंतरिम निर्णयाने मोठा धक्का दिला. आयोगाने शनिवारी रात्री तात्पुरता निर्णय जाहीर करत दोन्ही गटांना शिवसेना हे नाव वापरण्यास मनाई केली. तसेच, धनुष्यबाण हे चिन्हही गोठवले. तो निर्णय विधानसभेच्या एका जागेसाठी पुढील महिन्याच्या प्रारंभी होणाऱ्या पोटनिवडणुकीपुरता मर्यादित आहे. पण, त्या निर्णयामुळे तूर्त तरी शिवसेना कुणाचीच नसल्याचे चित्र समोर आले.