मुंबई – प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खानाच्या कबरीभोवती असलेले अनधिकृत बांधकाम हटवण्यास आज पहाटे पासून सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा संपूर्ण परिसरात तैनात करण्यात आला. तसेच प्रतापगडाच्या पायथ्याला कलम १४४ लागू करून कोणालाही त्या ठिकाणी जाण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. यावरुन आता सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी शिंदे-फडणवीस सरकारचं ‘ऑपरेशन शिवप्रताप’ यावर व्हिडिओ ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
भाजप नेते नितेश राणे यांचे ट्विट
‘शिवप्रताप दिन ! अफजल खान थडग्याजवळील अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात हटवले!!! महाराष्ट्रात हिंदुत्वादी सरकार आहे.. नाद नाही करायचा!!!’
जय शिवराय !! pic.twitter.com/jHURJIwrqv
— nitesh rane (@NiteshNRane) November 10, 2022