Amol Mitkari On Vijay Shivtare : बारामती लोकसभा मतदार संघामध्ये तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांच्या लढाईतीत आता विजय शिवतारे यांनी देखील शड्डू ठोकल्याने बारामती मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. अशात शिवतारेंनी हा विंचू अनेकांना डसला अन् महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसला अशा शब्दात अजित पवारांवर निशाणा साधला होता. त्यानंतर शिवतारेंच्या या टीकेवर अमोल मिटकरींनी ट्विट करत सूचक इशारा दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवतारे यांनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात तसेच सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामतीतून लढण्याबाबत तयारी सुरु केल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली होती. अशात शिवतारे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात होती. शिवतारे यांनी आपण अपक्ष मैदानात उतरणार असल्याचे जाहीर केले आणि अजित पवारांवर टीका केली. या टीकेला अमोल मिटकरींनी सडेतोड उत्तर दिल आहे. । Amol Mitkari On Vijay Shivtare
अमोल मिटकरींनी आपली ट्विटमध्ये चार ओळी पोस्ट केल्या आहेत. ट्विटमध्ये मिटकरी म्हणतात,”शिवतारे ठाम l कारण हवाय मोठा दाम l अपक्ष भरतो जो फॉर्म.. विंचवाची नांगी सर्वांग ll” यासह मिटकरींनी तोडपाणी हा हॅशटॅग देखील वापरला आहे. । Amol Mitkari On Vijay Shivtare
शिवतारे ठाम l
कारण हवाय मोठा दाम l
अपक्ष भरतो जो फॉर्म
विंचवाची नांगी सर्वांग ll #तोडपाणी— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 24, 2024
काय म्हणाले होते शवतारे नेमकं ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हात जोडून बारामतीची निवडणूक लढवू देण्याची विंनती विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच ‘हा विंचू अनेकांना डसला अन् महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसला’ अशा मार्मिक शब्दात शिवतारेंनी यावेळी अजित पवारांवर टीका देखील केली. । Amol Mitkari On Vijay Shivtare