मुंबई – अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर गेल्या अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघे अनेकदा एकमेकांच्या पोस्ट देखील शेअर करतात. तसेच दोघे कित्येकदा पार्टीसाठी देखील सोबत जातात. अशात आता मलायकाने शेअर केलेल्या एका पोस्टमुळे हे दोघेही लवकरच विवाह बंधनात अडणार असल्याच्या चर्च्यांना उधाण आले आहे.
मलाईका अरोराने आपल्या इंस्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे. परंतु यावेळी तिने दिलेले कॅप्शन लक्षवेधी ठरत आहे. I said YES असं कॅप्शन देत मलायकाने हार्ट इमोजी टाकत आपला फोटो पोस्ट केला आहे. विशेष म्हणजे या फोटोवर अभिनेता करण टक्करने ‘वाह वाह.. वाह वाह’ अशी कमेंट केली आहे. त्यासोबतच अभिनेत्री शमिता शेट्टीने तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
या पोस्टमध्ये मलायकाने स्पष्टपणे काही सांगितलेले नसले तरी फॅन्सने मात्र अर्जुन आणि मलायकाच्या लग्नाला दुजोरा देत दोघांनाही शुभेच्छा द्यायला सुरुवात केली आहे. अभिनेता अरबाज खान पासून २०१७ मध्ये वेगळं झाल्यानंतर मलायका आणि अर्जुनच्या रिलेशनच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. दोघांनी याबाबत कधीही स्पष्टपणे भाष्य केलं नाही. आताही मलायकाने स्पष्टपणे काहीही म्हटलेलं नसताना दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.