पिंपरी, (वार्ताहर) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यक्षेत्रातील चिखली रिव्हर रेसिडन्सी मागील इंद्रायणी नदीपात्र क्षेत्रात चालू असलेल्या अनधिकृत विनापरवाना बांधकामावर निष्कासनाची कारवाई करून सुमारे 3600 चौ. फुट क्षेत्रात सुरू असलेले अनधिकृत बांधकामाचे निष्कासन करण्यात आले.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे- पाटील यांच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात आली. क क्षेत्रीय कार्यालयाचे पथकामार्फत उपआयुक्त अण्णा बोदडे तसेच उपअभियंता सूर्यकांत मोहिते यांच्या नेतृत्वाखाली कनिष्ठ अभियंता किरण सगर, रचना दळवी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक निकिता फडतरे, स्मिता गव्हाणे व मनपा कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बल, महाराष्ट्र पोलीस, यांच्या नियंत्रणाखाली सदर कारवाई करण्यात आली.
आज अखेर प्रभाग क्र. 2 चिखली/जाधववाडी परिसरातील सुमारे 3600.00चौ.फुट आरसीसी बांधकामावर अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईत क क्षेत्रीय कार्यालयाकडील अतिक्रमण पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल व महाराष्ट्र पोलीस पथक, सहभागी झाले होते.
दररोज शहराच्या विविध भागात अतिक्रमण कारवाई केली जात आहे. नागरिकांनी रस्त्यांवर बेवारस वाहने उभी करू नये, तसेच अनधिकृत टपर्या व पत्राशेड व बॅनर्स उभारू नये. तसेच ़फुटपाथ स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे. महापालिका आयुक्त यांच्या निर्देशनानुसार सदर कारवाई केलेल्या ठिकाणी मनपा परवानगी घेतल्याशिवाय अनधिकृत पत्राशेड/ बांधकाम करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.