IND vs ENG 2nd Test Full Highlights : विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने इंग्लंडचा १०६ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने मालिकेत1-1 अशी बरोबरी साधली. इंग्लंडने पहिला कसोटी सामना 28 धावांनी जिंकला होता. आता पुढील तिसरी कसोटी 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवली जाणार आहे.
जसप्रीत बुमराह, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल आणि रविचंद्रन अश्विन यांनी भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. जैस्वालने पहिल्या डावात 209 धावा केल्या. तर, बुमराहने सामन्यात एकूण 9 विकेट घेतल्या. जसप्रीत हा सामन्याचा मानकरी ठरला. दुसरा कसोटी सामना चौथ्या दिवशीच संपला.
A splendid bowling display on Day 4 powers #TeamIndia to a 106-run win 🙌
Scorecard ▶️ https://t.co/X85JZGt0EV#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/P9EXiY8lVP
— BCCI (@BCCI) February 5, 2024
या सामन्यात 399 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ केवळ 292 धावांवरच मर्यादित राहिला. यादरम्यान जॅक क्रॉलीने संघासाठी 73 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली, ज्यात 8 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. याशिवाय एकाही इंग्लिश फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही, त्यामुळे त्यांना सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि पहिल्या डावात 396 धावा केल्या. या कालावधीत यशस्वी जैस्वालने संघासाठी 209 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली, ज्यात 19 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. मात्र, याशिवाय भारताच्या एकाही फलंदाजाला मोठा खेळी खेळता आली नाही.
त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजीला आलेला इंग्लंडचा संघ केवळ 253 धावांत गारद झाला. यानंतर भारताने दुसऱ्या डावात 255 धावा फलकावर लावल्या आणि इंग्लिश संघाला 399 धावांचे लक्ष्य दिले, जे त्यांना गाठता आले नाही. यादरम्यान भारताकडून जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी 3-3 बळी घेतले. याशिवाय मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.