Tiger 3 – मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेला अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) ‘टायगर 3’ (Tiger 3) हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 12 नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली.
विशेष म्हणजे या चित्रपटात सलमानसह शाहरुख खानच्या कॅमिओची देखील चांगलीच चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर टायगर 3 (Tiger 3) या चित्रपटातील शाहरुखच्या कॅमिओचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सलमान खानला शत्रूंपासून वाचवत असल्याचे दिसत आहे.
सलमान खान हा दुश्मनांसोबत फाईटिंग करताना शाहरुख हा एक बॉम्ब तिथे टाकतो. त्यावेळी झुमे जो पठाण हे गाणं ऐकू येत आहे. त्यानंतर शाहरुख खानची एन्ट्री होते. सध्या सगळीकडे याच सिनेमाची चर्चा होताना दिसत आहे. हिंदीसोबतच तेलुगू आणि तमिळ भाषेत प्रदर्शित झालेल्या ‘टायगर 3’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल 44 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे.
चित्रपट गृहात फटाके फोडून जल्लोष ! @BeingSalmanKhan च्या चाहत्यांकडून #Tiger3 चं दमदार स्वागत#Tiger3Superhit #BoxOffice @mystery0725 @iamsrk @yrf @KatrinaKaifFB pic.twitter.com/PjWK5KPqsa
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) November 13, 2023
नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडीओमध्ये महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव इथल्या एका थिएटरमध्ये चाहते फटाके फोडताना दिसत आहेत. मालेगावमधील मोहन सिनेमामधील ही घटना आहे. अतिउत्साही चाहत्यांनी केलेल्या या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
As Usual 💥 Salman Khan Fanclub Malegaon continues the TREND of Bursting Crackers in Theatres on Salman Khan’s Entry, Though It is not advised but Fans ka emotion kon Samjhe 💀💥 #Tiger3review #Tiger3 pic.twitter.com/HIoVWKEWBp
— YOGESH (@i_yogesh22) November 12, 2023
दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. छावणी पोलीस ठाण्यात मोहन थिएटरविरोधात कलम 112 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतलं गेलंय. फक्त मालेगावमध्येच नाही तर देशातील इतर भागांतील थिएटरमध्येही सलमानच्या चाहत्यांनी फटाके फोडल्याच्या घटना घडल्या आहेत.