मुंबई – ड्रग्ज केस प्रकरणी मागील 25 दिवसांपासून कोठडीत असणाऱ्या आर्यन खान याला अखेर उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना जामीन दिला आहे.
सर्वांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने जामिनावर अंतिम निर्णय दिला. त्यामुळे आर्यन खानची दिवाळी तुरुंगात न जाता आपल्या घरी मन्नतवर जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, आपला जमीन मंजूर झाल्याचे समजताच आर्यन खूप खुश झाला होता. यावेळी त्याने तुरुंगातील इतर कर्मचाऱ्यांचे आभार देखील मानले. आर्यनला जामीन मिळाल्यानंतर चाहत्यांमध्ये देखील आनंदाचं वातावरण पाहायला मिळाले.
View this post on Instagram
अनेक चाहत्यांनी तर मन्नतसमोर येऊन फटाके फोडत आनंद व्यक्त केला. तर बॉलिवूड सेलिब्रिटींनी सुद्धा सोशल मीडियावर अभिनेता शाहरुख खानला शुभेच्छा आणि आधार दिला.
View this post on Instagram
आर्यन खानला संध्याकाळी 6च्या दरम्यान जेवणावेळी जामीन मिळाल्याची खूशखबर देण्यात आली. यानंतर आर्यनच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत होता. ही बातमी दिलेल्या अधिकाऱ्यांचे आर्यनने आभार मानले.
तर तुरुंगात ओळख झालेल्या कैद्यांकडे गेला आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचे आश्वासन सुद्धा यावेळी आर्यनने त्यांना दिले.