जान्हवीने पुन्हा घातला ‘शिकू’ नावाचा ‘नेकलेस’

Janhvi Kapoor । गेल्या काही दिवसांपासून जान्हवी कपूर शिखर पहाडियाला डेट करत असल्याच्या बातम्या समोर येत आहे. पण दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल जाहीरपणे काही बोलले नाही किंवा ते स्वीकारले नाही. ते अनेकदा एकत्र दिसतात आणि तिरुपती मंदिरालाही एकत्र भेट देतात.
गेल्या महिन्यात ‘मैदान’च्या स्क्रिनिंगदरम्यान जान्हवीने एका वेगळ्या पद्धतीने तिच्या नात्याची पुष्टी केली होती, जेव्हा तिने नेकपीस घातला होता ज्यावर ‘शिकू’ लिहिले होते. आता अशात पुन्हा एकदा जान्हवी उघडपणे तिच्या बॉयफ्रेंडचे नाव घेत आहे.
जान्हवी कपूर शिखरला प्रेमाने ‘शिकू’ म्हणते आणि ‘कॉफी विथ करण’मध्येही तिने चुकून शिखरला याच नावाने हाक मारली होती. नुकत्याच एका कार्यक्रमात ही अभिनेत्री दिसली आणि तिने पुन्हा एकदा तोच ‘शिकू’ नेकपीस घातला. जान्हवी नेहमीप्रमाणेच खूप सुंदर दिसत होती, तिने क्लासी चेकर ड्रेस घातला होता, जो शॉर्ट होता. जान्हवीने हे फोटो शेअर करताच इंटरनेटवर तिचे कौतुक होऊ लागले आणि प्रत्येकजण तिच्या नेकपीसबद्दल बोलत आहे.
शिखर हा माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. तर जान्हवीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री राजकुमार रावसोबत ‘उलझ’ आणि ‘मिस्टर अँड मिसेस माही’मध्ये दिसणार आहे.





