Arvind Kejriwal । लोकसभा निवडणुकीबाबत आम आदमी पक्ष आणि भाजप या दोन्ही पक्षांनी दिल्लीतील त्यांच्या अनेक उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. दिल्लीत 7 जागांसाठी लढत आहे. अशा स्थितीत काँग्रेससह भाजप आणि आम आदमी पक्षाने भाजपविरोधी वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. आज केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही त्यांच्या निवडणूक प्रचाराची घोषणा केली आहे. आप पक्ष प्रामुख्याने महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे संकेत दिले आहेत.
दिल्लीतील सिविक सेंटरमध्ये आयोजित महिला सन्मान सोहळ्याने आम आदमी पक्षाने आपल्या निवडणूक प्रचाराची सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे यावेळी दिल्लीच्या अर्थसंकल्पात महिला सन्मान योजनेंतर्गत 1000 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
यावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टाऊनहॉल अधिवेशनात दिल्लीतील महिला मतदारांची भेट घेतली. केजरीवाल यांनी महिला मतदारांना आगामी लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. अशात अरविद केजरीवाल यांचे आवाहन सध्या चांगलेच चर्चेत आले आहे
Arvind Kejriwal । नेमकं काय म्हणाले अरविंद केजरीवाल
अरविंद केजरीवाल यांनीही महिलांना पतीला पटवण्याचा फॉर्म्युला सांगितला आहे. तुमच्या नवऱ्याने मोदी मोदी करत मोदींच नाव घेतलं तर त्याला जेवायला देऊ नका, आपली शपथ देत त्यांना मोदींना मतदान देण्यापासून थाबवा असंही त्यांनी म्हटलं आहे. यानंतर प्रत्येक पतीला आपल्या पत्नीने जे सांगितले आहे त्याचे पालन करावे लागेल.
केजरीवाल पुढे म्हणाले की, ’18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व महिलांना 1,000 रुपये देण्याची आम आदमी पार्टीची योजना त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र करेल. केजरीवाल म्हणाले की, जर एकाच कुटुंबात अनेक पात्र महिला असतील तर त्या सर्वांना योजनेचा लाभ घेता येईल.’
यासोबतच अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, ते (भाजप) म्हणतात की, या योजनेमुळे महिलांचा नाश होईल. दिल्लीतील प्रत्येक महिलेला एक हजार रुपये देऊन केजरीवाल पैशाची उधळपट्टी करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मी त्यांना विचारतो की, तुम्ही अनेकांची मोठी कर्जे माफ केलीत, ते चुकीचे नव्हते का?’ असा उलट प्रश्नच केजरीवाल यांनी विचारला आहे.
हेही वाचा
‘सुप्रिया सुळेंना पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्यांना निवडून देणं, मतदारांची जबाबदारी’ – शरद पवार