Miss World 2024 Krystyna Pyszkova| मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये तब्बल 27 वर्षानंतर मिस वर्ल्ड 2024 चे आयोजन करण्यात आले होते. यापूर्वी 1996 मध्ये ही स्पर्धा भारतातील बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आली होती. या सोहळ्याला अनेकांनी हजेरी लावली होती. या स्पर्धेत जगभरातील 117 तरुणींनी सहभाग घेतला होता. चेक रिपब्लिकची क्रिस्टिना पिस्कोव्हा यंदाची विश्वसुंदरी ठरली आहे. यात भारताची सिनी शेट्टीने देखील सहभाग घेतला होता. मात्र सिनी पहिल्या 4 मधून बाहेर पडली होती. यावेळी तिला अश्रु अनावर झाले होते.
71व्या ‘मिस वर्ल्ड’चा ताज जिंकणारी क्रिस्टीना पिस्कोवा ही चेक रिपब्लिकची रहिवासी आहे. एवढेच नाही तर क्रिस्टीना पिस्कोवा 27 वर्षांची आहे. क्रिस्टीना अतिशय सुंदर आणि हुशार आहे. तिला सामाजिक कार्यात योगदान द्यायला आवडते. कारण ही केवळ सौंदर्य स्पर्धा नसून सामाजिक कार्यातही ती सहभागी आहे. योगदान आणि बुद्धिमत्ता हे देखील ओळखले जाते.
कोण आहे ‘मिस वर्ल्ड 2024’ क्रिस्टिना पिस्कोव्हा? Miss World 2024 Krystyna Pyszkova|
क्रिस्टिना पिस्कोव्हाचा जन्म 19 जानेवारी 1999 मध्ये झाला. तिने वकिलीचं शिक्षण घेतलं आहे. मॉडेलिंगसह ती सामाजिक कार्यातही अग्रेसर आहे. क्रिस्टिनाची ‘क्रिस्टिना पिस्कोव्हा फाऊंडेशन’ ही संस्था आहे. टांझानियातील वंचित, गरीब विद्यार्थ्यांसाठी तिने शाळा सुरू केली आहे. ही शाळा क्रिस्टिना स्वत: चालवते. क्रिस्टिना सामाजिक संस्थेत स्वयंसेवक म्हणून काम करते.
मिस वर्ल्डच्या इंस्टाग्रामवर 71 व्या ‘मिस वर्ल्ड’चा मुकुट परिधान केलेल्या क्रिस्टीना पिस्कोवाचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती हात वर करून सर्वांचे आभार व्यक्त करताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मिस वर्ल्ड चेक रिपब्लिक, @krystyna_pyszko, 71 वी मिस वर्ल्ड!! लेबनॉनची @yasminazaytoun ही पहिली उपविजेती ठरली. क्रिस्टीना, मिस वर्ल्ड कुटुंबाकडून अभिनंदन आणि स्वागत!’ क्रिस्टिना पिस्कोव्हाला सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 181K फॉलोअर्स आहेत.
सिनी शेट्टी टॉप 4 मधून बाहेर Miss World 2024 Krystyna Pyszkova|
या स्पर्धेत 2022 साली मिस इंडियाचा किताब पटकावणाऱ्या सिनी शेट्टीनेही भारताच्या बाजूने मैदानात उतरली होती, जी टॉप 4 मधून बाहेर होती, मात्र तिने या स्पर्धेत भारताचे चांगले प्रतिनिधित्व केले.
हेही वाचा :