पिंपरी – पत्रकार असलेल्या ओळखपत्राचा गैरवापर करून मद्याच्या बाटल्या बाळगणाऱ्या एकाला गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (दि. 12) रात्री आठच्या सुमारास ताथवडे चौकात करण्यात आली आहे. त्याच्याकडून 14 हजार रुपयांची दारु जप्त करण्यात आली आहे.
सतीशकुमार विश्वनाथ बोगिले (वय 30, रा. गणेशनगर, वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई एस. एस. गावंडे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्याकडे असलेले प्रेस रिपोर्टरच्या ओळखपत्राचा गैरवापर केला.