Income Tax Raid – कर्नाटक, तेलंगणा, दिल्ली आणि आंध्र प्रदेशमधील 55 हून अधिक ठिकाणी कंत्राटदार आणि रिअल इस्टेट डेव्हलपर्सवर सुरू असलेल्या छाप्यांमध्ये आयकर विभागाने सुमारे 94 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.
सीबीडीटीने सांगितले की, या छाप्यात 94 कोटी रुपये रोख, 8 कोटी रुपयांचे सोने, हिऱ्यांचे दागिने आणि 30 आलिशान घड्याळे जप्त करण्यात आली आहेत. 12 ऑक्टोबर रोजी शोध सुरू करण्यात आला आणि या काळात विभागाने बेंगळुरू आणि शेजारच्या तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील काही शहरे तसेच दिल्लीतील 55 परिसरांवर छापे टाकले.
.@IncomeTaxIndia conducts searches in Karnataka, Andhra Pradesh and Telangana State region
The search has resulted in seizure of unaccounted cash of approximately Rs.94 crore and gold and diamond jewellery of over Rs.8 crore, aggregating to more than Rs. 102 crore
Read here:…
— PIB India (@PIB_India) October 16, 2023
102 कोटींहून अधिक रक्कम जप्त –
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) एका निवेदनात म्हटले आहे की, “छाप्यामध्ये सुमारे 94 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड आणि 8 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोने आणि हिऱ्यांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत, जे एकूण 102 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहेत,” याशिवाय, आरोपीची ओळख उघड न करता CBDT ने सांगितले की, एका खाजगी पगारदार कर्मचाऱ्याच्या आवारातून सुमारे 30 लक्झरी विदेशी घड्याळांचा संग्रह जप्त करण्यात आला.
भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप –
“बेहिशेबी” रोख जप्त झाल्यानंतर, या प्रकरणावरून कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी भाजप यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील म्हणाले की, हा पैसा काँग्रेसशी संबंधित आहे. दरम्यान, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हा आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.
छाप्यादरम्यान कागदपत्रांच्या हार्ड कॉपी आणि डिजिटल डेटाही जप्त करण्यात आला आहे. यावरून हे स्पष्ट झाले आहे की, आरोपींनी केवळ करच चुकविला नाही तर कंत्राटदारांनी बनावट खरेदी करून खर्च वाढवून त्यांचे उत्पन्नही कमी केले. छाप्यादरम्यान, गुड्स रिसीप्ट नोट (जीआरएन) पडताळणीमध्ये तफावत आढळून आली तसेच अनेक कागदपत्रांमध्येही प्रचंड तफावत आढळून आली आहे.
CBDT हे आयकर विभागासाठी धोरणे बनवते.