पाकिस्तान कारगिलसारखे दुस्साहस पुन्हा करणार नाही

नवी दिल्ली – पाकिस्तानने कारगिलचे युद्ध करून चूक केली होती. त्याचे त्यांना असे परिणाम भोगावे लागले की आता ते पुन्हा तशी चूक करायची हिंमत करणार नाहीत, असे लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी सांगितले आहे. कारगिल युद्धाला 20 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे सांगितले आहे.

त्या युद्धाच्या वेळी असा एकही भाग नव्हता जो आम्ही ताब्यात नव्हता घेतला. त्यांना हुसकावून लावले होते. त्यांनी युद्धाचे परिणाम काय होतात ते पाहिलेले आहे. त्यामुळे पुन्हा ते कारगिलसारखी चूक करण्याची हिंमत करणार नाहीत. कारगिल युद्धाला 20 वर्ष झाली. हा ऐतिहासिक क्षण आहे. आम्ही तो क्षण साजरा करत आहोत, असे यावेळी रावत यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.