पुणे(प्रतिनिधी) – मोबाईल रिचार्ज करण्यावरुन झालेल्या वादात पत्नीला लाकडी स्टुलने मारहाण करण्यात आली. ही घटना भवानी पेठ फकीर मोहंमद चाळ येथे घडली. याप्रकरणी पतीविरुध्द खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रियाज फयाज खान(47) असे आरोपीचे नाव आहे. पती-पत्नीमध्ये मोबाईल रिचार्ज करण्यावरुन वाद झाला होता. यावेळी रागाच्या भरात रियाजने लाकडी स्टुल उचलून पत्नीला मारला. पत्नीने स्टुल वाचविण्याकरीता दोन्ही हात आडवे धरले होते. यावेळी रियाजने दोन ते तीन वेळा तीच्या हातावर स्टुलने मारहाण केली. यामध्ये तीच्या दोन्ही हाताला इजा झाली असून एक हात फ्रॅक्चर झाला आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक सावंत करत आहेत.