पुणे : एका मास्क घातलेल्या व्यक्तीने महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याचा प्रकार ससून रोड येथे घडला. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला घटनेच्यावेळी राहत्या इमारतीखाली भावाशी फोनवर बोलत होती.
यावेळी मोपेडवर असलेली एक व्यक्ती तीच्याकडे पाहून अश्लिल हावभाव करत होती. फिर्यादी त्याच्याकडे दुर्लक्ष करुन घरी जात होत्या. इतक्यात त्याने अचानक येऊन तीचा विनयभंग केला. पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहे.