दोहा – फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत पहिला उपांत्य सामना बुधवारी(दि.14डिसेंबर) मध्यरात्री 12.30 वाजता बलाढ्य अर्जेन्टिना व क्रोएशिया यांच्यात रंगणार आहे. हा सामना जिंकून अंतिम फेरीत पात्र होण्यासाठी दोन्ही संघ सज्ज असले तरीही या सामन्यात अर्जेन्टिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीच निर्णायक ठरणार आहे. तर उपांत्य फेरीतील दुसरा सामना गुरुवारी मध्यरात्री फ्रान्सविरुद्ध मोरोक्को यांच्यात होणार आहे.
या स्पर्धेच्या इतिहासात 1998 साली क्रोएशियाने उपांत्य फेरी गाठली होती. मात्र, त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. 2018 साली क्रोएशिया संघ अंतिम फेरीत प्रवेश केला होता मात्र, त्यावेळीही त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. अर्जेन्टिना व मोरोक्को हे दोन्ही संघ दक्षिण अमेरिका खंडातील असून फ्रान्स व क्रोएशिया हे युरोप खंडातील देश आहेत. त्यामुळे यंदाचा करंडक युरोपातच राहतो का दक्षिण अमेरिका खंडात जातो हे पाहण्यासाठी करोडो चाहते उत्सुक बनले आहेत.
Four semi-finalists confirmed as France beat England – #FIFAWorldCup 2022
Croatia 🇭🇷
Argentina 🇦🇷
Morocco 🇲🇦
France 🇫🇷 pic.twitter.com/tTSrSTP7hP— Doordarshan Sports (@ddsportschannel) December 10, 2022
करंडकासाठी मेस्सी प्रयत्नशील
यंदाच्या स्पर्धेत सातत्याने कामगिरी केलेल्या अर्जेन्टिना संघाने करंडक जिंकण्याची दावेदारी भक्कम केली आहे. आता उपांत्य फेरीत विजय प्राप्त करत थाटात अंतिम फेरी गाठण्याचे त्यांचे स्वप्न आहे. त्याचबरोबर पुढील 2026 सालची स्पर्धा खेळण्याची संधी मिळेल का हे माहीत नसलेल्या मेस्सीसाठी यंदाची स्पर्धा जवळपास अखेरची संधी असेल. 1986 सालानंतर अर्जेन्टिनाला विश्वकरंडक जिंकता आलेला नाही. त्यामुळे यंदा मेस्सी त्याची जादू दाखवत देशाला करंडक जिंकून देणार का हेच पाहणे महत्त्वाचे ठरेल.
China : चीनचा प्रभाव असलेल्या देशांमध्ये ‘हा’ देश अव्वल क्रमांकावर
( दैनिक प्रभातच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.)