बिजिंग – चीनमध्ये करोनाचा संसर्ग पुन्हा वाढला असून शांघायमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. करोनाचा नवा व्हेरिएंट समोर आल्याने अनेकांच्या चिंता वाढल्या आहेत. ओमायक्रॉन व्हेरिएंटचा हा नवा उपप्रकार अधिक वेगाने पसरत आहे. यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाली आहे.
शांघाय शहरात शुक्रवारी 1.3 लाख जणांच्या सामूहिक चाचणीचे आदेश देण्यात आले आहे. तसेच या चाचणीचे अहवाल प्राप्त होईपर्यत सर्वांना घरातच बंदिस्त ठेवण्यात येणार आहे. याशिवाय पूर्वेकडील शांघायपासून ते पश्चिमेकडील तिबेटपर्यंत देशभरात कडक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत, जेथे लॉकडाउन विरोधी निषेध देखील नोंदवले गेले आहेत.
चीनच्या वुहान शहरात पहिला व्हायरल मिळाला होता. 2019 मध्ये जगातील पहिले करोनाचे प्रकरण पुढे आल्यानंतर तो वेगाने पसरला आणि त्यानंतर लॉकडाऊन लावावे लागले. पण पुन्हा एकदा वुहानमध्ये करोनाचे रुग्ण वाढू लागल्याने लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
चीनमध्ये करोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढू लागला आहे. वुहानच्या अनेक शहरात करोनाचे रुग्ण आढळल्याने लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या भागात इमारती सील करण्यात आल्या आहेत. चीनमध्ये लागपोठ तिसऱ्या दिवशी करोनाचे 1,000 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. 30 ऑक्टोबर पर्यंत हा लॉकडाऊन लागू असणार आहे. त्यामुळे लोकांना घराबाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.