कोची : करोनाला मात देण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, करोना बाधित बरा करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर प्रायोगिक तत्वावर करण्यास केरळला इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल सायन्सने परवानगी दिली आहे. अशा प्रकारचा प्रयोग करण्यास परवानगी मिळालेले केरळ हे पहिलेच राज्य आहे.