मुंबई – राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान (Namo Shetkari Mahasanman yojana) निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याला मंजुरी देण्यात आली असून दोन हजारांचा पहिला हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेसाठी 1 हजार 720 कोटी रुपयांच्या निधीस शासनाची मान्यता देण्यात आली आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. (Shetkari Mahasanman yojana)
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याला राज्य सरकारकडून वर्षाकाठी 6 हजार रुपये मिळणार आहे. एप्रिल ते जुलै 2023 कालावधीसाठी पहिला हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे मिळून वर्षाला एकूण 12 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी अर्थ संकल्प मांडताना याची घोषणा केली होती.
एप्रिल 2023 ते जून 2023 या कालावधीसाठीच्या पहिल्या हप्त्याला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहेत.या योजनेचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना या धर्तीवर ही योजना लागू करण्यात आली आहे.
नमो शेतकरी महासन्मान योजना काय?
ही केंद्राच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसारखीच योजना आहे.
या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर महाराष्ट्र सरकार वर्षाला सहा हजार रुपये जमा करेल.
केंद्र सरकारकडून दर तीन महिन्याला दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात.
शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला केंद्राचे सहा हजार व महाराष्ट्र सरकारचे सहा हजार रुपये असे एकूण 12 हजार रुपये जमा होतील.