मुंबई :– एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सलामीच्या लढतीत खेळपट्टीचा अंदाज न घेता पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा ऑस्ट्रेलियाने घेतलेल्या निर्णयाचे आश्चर्य वाटले, असे मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे.
या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना फारशी मदत मिळेल असे हे खेळपट्टी पाहुनच दिसत होते, मात्र, त्यावर फिरकी गोलंदाज चेंडू नवा असेल तरीही वर्चस्व राखतील हे देखील जाणवत होते. त्या सामन्यात अगदी तसेच घडले. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला असता तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता. अर्थात दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी खेळपट्टी अजिबात मदत करत नसली तरीही विराट कोहली व लोकेश राहुल यांनी जी खेळी केली त्यासाठी त्यांचे अभिनंदन, असेही सचिन म्हणाला.
I was surprised to see Australia bat first after winning the toss. Commendable performance by the Indian bowlers to restrict them to 199. Australia started well but I felt they missed a left-arm spinner on this surface. The partnership between Virat and Rahul sealed the game for… pic.twitter.com/qUr21Vaqxb
— Sachin Tendulkar (@sachin_rt) October 8, 2023
दरम्यान, रविवारी भारतीय संघाने आपल्या विश्वचषकाच्या मोहिमची (Mission World Cup) दणक्यात सुरुवात केली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या सामन्यात बलाढ्या ऑस्ट्रेलियाला (India beat Australia) पराभूत करत आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा 2023 मध्ये विजयी सलामी दिली आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 49.3 षटकांत सर्वबाद 199 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल भारताने चार गडी गमावून 41.2 षटकात 201 धावा करत विजय साकार केला.
ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर टीम इंडिया आता दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झालीय. 11 ऑक्टोबरला भारतीय संघ अफगाणिस्तानशी (India vs Afghanistan) भिडणार आहे. दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार असून भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता हा सामना सुरु होईल.
अफगाणिस्तानविरुद्ध भारताची संभाव्य प्लेइंग-11
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर/सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन/शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.