कॅनबेरा – समुद्राखालील जीवसृष्टीमध्ये ऑक्टोपस हा अतिशय महत्त्वाचा आणि अद्भुत प्राणी मानला जातो या ऑक्टोपसचे विविध प्रकार असून त्यामध्ये ब्लॅंकेट ऑक्टोपस नावाने ओळखला जाणारा एक दुर्मिळ असा ऑक्टोपस आहे ऑस्ट्रेलियातील समुद्रकिनाऱ्यावर या ब्लॅंकेट ऑक्टोपसचे दर्शन झाले हा ऑक्टोपस विविध रंगांचा असतो समुद्र शास्त्रज्ञ आणि रीफ गाईड जेसीका शेकल्टन यांना या अनोख्या प्राण्याचे दर्शन समुद्राखाली संशोधन करत असताना झाले.
त्यांना प्रथम या ऑक्टोबरचे दर्शन झाले तेव्हा त्यांना प्रथम तो मोठ्या पंखाचा मासा वाटला पण जवळ गेल्यावर त्यांच्या तो प्राणी ब्लॅंकेट ऑक्टोपस ची मादी असल्याचे लक्षात आले ब्लॅंकेट ऑक्टोपस अतिशय दुर्मिळ असा प्राणी असून यापूर्वी 21 वर्षापूर्वी या प्राण्याचे दर्शन ऑस्ट्रेलियाच्या समुद्र किनार्यावरच झाले होते.