इस्लामाबाद – जगातील दहशतवाद्यांचे आश्रयस्थान असणाऱ्या पाकिस्तानमध्ये शस्त्रांची खुलेआम विक्री सुरू असते एखाद्या पिझ्झाप्रमाणे शस्त्रांची घरपोच डिलिव्हरीसुद्धा केली जाते. ऑनलाईन ऑर्डर नोंदवतात ठराविक दिवसात घरपोच शस्त्रे मिळतात. पाकिस्तान मधील समा टीव्ही या वृत्तवाहिनीने याबाबतच्या सविस्तर तपशील नुकताच जाहीर केला आहे.
ऑनलाइन पद्धतीने एखादे हत्यार किंवा शस्त्र निवडताच संबंधित व्यक्तीशी फोनवर संपर्क साधावा लागतो त्यानंतर किंमत अंतिम ठरली की शस्त्रांची डिलिव्हरी घरपोच पत्त्यावर केली जाते. सोशल मीडियाचा विविध प्लॅटफॉर्मचा वापर करून हा सर्व बाजार चालतो. एके फोर्टी सेवन सारख्या घातक शस्त्रास्त्रांचा व्यापारही या पद्धतीने होतो सोशल मीडियाचा वापर करून हे व्यवहार चालतात पाकिस्तान ज्या व्यक्ती ही शस्त्रे आणि हत्यारे खरेदी करत आहेत. त्यांच्याकडे ही हत्यारे वापरण्यासाठी परवाना आहे की नाही याची चौकशी सुद्धा या व्यवहारांमध्ये केली जात नाही.
समा टीव्हीने आपल्या या कार्यक्रमात अशा पद्धतीने शस्त्रे मिळणाऱ्या एका व्यक्तीची मुलाखत प्रसिद्ध केली होती. त्याने अडतीस हजार रुपयात एक पिस्तुल खरेदी केले होते ऑर्डर नोंदवताना दहा हजार रुपये देण्यात आले होते आणि प्रत्यक्ष पिस्तुलाची डिलिव्हरी झाल्यानंतर उरलेले 28 हजार रुपये देण्यात आले.
समा टीव्हीने दिलेल्या माहितीप्रमाणे ऑर्डर ची नोंद करून घेणारे नेटवर्क वेगळे असून ऑर्डर प्रमाणे या शस्त्रांचे सप्लाय करणारे नेटवर्क वेगळे आहे त्यामुळे अनेक वेळा या दोघांनाही एकमेकांच्या व्यवसायाची माहिती नसते फक्त ऑर्डर नोंद झाल्यानंतर ऑर्डर नोंद करून घेणारी कंपनी सप्लाय करणाऱ्या कंपनीला कळवते आणि ती कंपनी डायरेक्ट त्या ग्राहकाच्या दारात शस्त्रे पुरवठा करते.