हडपसर, दि. 2 (प्रतिनिधी) -मांजरी बुद्रुक येथील मुळा-मुठा नदी पात्रासह हडपसरमधून वाहणाऱ्या नवीन कालव्यात थेट गणेश विसर्जनास मनाई करण्यात आली आहे. हडपसर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 36 ठिकाणी मूर्ती संकलनास 15 फिरते विसर्जन हौदांची व्यवस्था पालिकेकडून करण्यात आली आहे, असे सहाय्यक आयुक्त प्रसाद काटकर यांनी सांगितले.
कालवा परिसर आणि नदीकाठावर असलेल्या विसर्जन घाटांवर बांबू तसेच बॅरेकेट्स बांधण्यात येणार आहेत. प्रभाग क्र. 22, 23, 26, 42 आणि नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांत 36 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र व निर्माल्य जमा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाचे 15 फिरते हौद तयार असून प्रत्येक आरोग्य कोठीकडून तो फिरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी 36 मोबाइल टॉयलेट, 12 जीवरक्षक व 251 स्वच्छता कर्मचारी व मदतनीस यांची गणेश विसर्जन व्यवस्थेसाठी नेमणूक करण्यात आली आहे.
गणेशमूर्ती येथे देता येतील…
प्रभाग क्र. 22 : मुंढवा भाजी मंडई, राजर्षि शाहू शाळा मुंढवा, मगरपट्टा सिटी कै. लक्ष्मीबाई मगर शाळा क्र.77. बी, भोसले गार्डन हडपसर, पवार शाळा विठ्ठलनगर, आकाशवाणी आरोग्य कोठी पाण्याची टाकी, न्यू इंग्लिश स्कूल डी पी रोड माळवाडी. प्रभाग क्र. 23 : मनपा शाळा क्र.32 हडपसर गाव, महात्मा फुले क्रीडा संकुल हिंगणे मळा, बंटर शाळा गाडीतळ हडपसर, गोंधळेनगर भाजी मंडई समोर, मारुतराव काळे शाळा काळेपडळ, हनुमान बाल उद्यान तुकाई टेकडी. प्रभाग क्र. 26 : सदाशिव नगर हंडेवाडी रोड, महमंदवाडी हडपसर, गावठाण शाळा लोणकर गार्डन कौसर बाग कोंढवा, दशक्रिया विधी घाट कोंढवा. प्रभाग क्र. 42 : महादेव मंदिर लगत केशवनगर कुंभारवाडा, जिल्हा परिषद शाळा साडेसतरानळी, बेंदवाडी पुलाजवळ फुरसुंगी, शिवशक्ती चौक- गंगानगर रिक्षा स्टॅंड मनपा संपर्क कार्यालय फुरसुंगी, गंगानगर महात्मा फुले वसाहत, संजुदा कॉम्प्लेक्स जवळ पापडे वस्ती, भेकराईनगर आरोग्य कोठी. तसेच ग्रामपंचायत हांडेवाडी, ग्रामपंचायत कार्यालय होळकरवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवाळेवाडी, ए.एम.कॉलेज महादेवनगर, राम मंदिर मांजरी फार्म, पी.एम.आर.डी प्लॉट शेवाळेवाडी फाटा, ग्रामपंचायत कार्यालय मांजरी बुद्रुक, जिल्हा परिषद शाळा म्हसोबा वस्ती मांजरी बुद्रुक.