Sports In Pune – हॉटफुट स्पोर्ट्स यांच्या तर्फे आयोजित सातव्या अपोलो हॉटफुट करंडक युवा साखळी फुटबॉल स्पर्धेच्या ११ वर्षाखालील गटामध्ये ब्राका फुटबॉल अॅकॅडमी, फोर लायन्स् फुटबॉल अॅकॅडमी, सिग्मय फुटबॉल क्लब, उत्कर्ष क्रिडा मंच या संघांनी प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून आगेकूच केली.
बावधन येथील हॉटफुट अॅकॅडमीच्या मैदानावर झालेल्या ११ वर्षाखालील गटाच्या सामन्यात रायन टिंगरे, सियाज कश्यप आणि कविश नाईक यांच्या गोलपूर्ण कामगिरीच्या जोरावर ब्राका फुटबॉल अॅकॅडमीने साई फुटबॉल अॅकॅडमीचा ६-१ असा सहज पराभव केला. फोर लायन्स् फुटबॉल अॅकॅडमी ब संघाने फाल्कन्स् फुटबॉल अॅकॅडमीचा ११-२ असा ९ गोलांच्या फरकाने धुव्वा उडविला. फोर लायन्स् संघाकडून मोक्क्ष गांधी याने ६ गोल नोंदविले.
रायाह भगत आणि प्रग्यान शहा यांनी प्रत्येकी दोन तर, हेयांग पटेल याने एक गोल केला. फाल्कन्स् फुटबॉल अॅकॅडमीकडून आरव शहा व निनाद सरदेशपांडे यांनी गोल केले. हर्षल वारघे, प्रेरीत अदे, शिवांश नायडु यांनी केलेल्या गोलांच्या जोरावर सिग्मय फुटबॉल क्लब संघाने लौकिक फुटबॉल अॅकॅडमी अ संघाचा ३-१ असा सहज पराभव केला.
१३ वर्षाखालील गटाच्या सामन्यात आदित्य दशपुत्रे आणि गौतम चव्हाण यांच्या गोलांमुळे बंगलुरू एफसी एलिट ब्ल्यु संघाने लौकिक फुटबॉल अॅकॅडमीचा २-० असा सहज पराभव केला. स्टेपओव्हर फुटबॉल अॅकॅडमी संघाने सलग दोन विजय मिळवले. युग चव्हाण याने केलेल्या गोलाच्या जोरावर स्टेपओव्हर संघाने उत्कर्ष क्रिडा मंच ब संघाचा १-० असा पराभव केला.
दुसर्या सामन्यात स्टेपओव्हर फुटबॉल अॅकॅडमीने फोर लायन्स् फुटबॉल अॅकॅडमी क संघाचा ४-० असा सहज पराभव केला. स्टेपओव्हर अॅकॅडमीकडून रायन मोथेदन, अर्णव ठाकरे आणि तन्विश खैरनार यांनी गोल नोंदविले. नचिकेत जोशी आणि आदीत तटी यांनी नोंदविलेल्या गोलांमुळे लौकिक फुटबॉल अॅकॅडमीने उत्कर्ष क्रिडा मंच ब संघाचा ३-१ असा पराभव केला.