मेलबर्न : पाच वेळच्या ग्रँडस्लॅम विजेत्या रशियाच्या मारिया शारापोवाला आॅस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत वाइल्ड कार्डव्दारे प्रवेश देण्यात आला आहे. आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धा २० जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२० दरम्यान होणार आहे.
We'll see you at #AO2020 @MariaSharapova…https://t.co/s9Ahx8UJRI
— #AusOpen (@AustralianOpen) January 8, 2020
३२ वर्षीय शारापोवाने साल २००८ मध्ये ही स्पर्धा जिंकली आहे. नुकत्याच झालेल्या ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत शारपोवाला पहिल्याच फेरीत पराभव पत्कारावा लागला आहे.
२०१९ साली दुखापतीमुळं त्रस्त असलेल्या शारापोवाला या स्पर्धेव्दारे आपली कारकिर्दीत सुधारणा करण्याची ही संधी असणार आहे. सध्या शारपोवाची जागतिक क्रमवारीत १४७ व्या स्थानावर घसरण झाली आहे. शारापोवा आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत १६ व्यांदा सहभागी होत आहे.