पुणे स्टेशन येथून प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपीचा निर्णय
पुणे – पीएमपीने रेल्वे स्थानक आवारातून रात्रीची बससेवा सुरू केली. मात्र, प्रवाशांसाठी बसची संख्या अपुरी पडत असल्याने रेल्वे स्थानकाच्या लेन चारमधून पुढील आठवडाभरात भोसरी आणि निगडी या दोन बस वाढवण्यात येणार आहेत.
पीएमपीने रेल्वे स्थानकातून निगडी बस औंधमार्गे व भोसरी बस विश्रांतवाडीमार्गे सुरू केली जाणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड भागात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे. दरम्यान, यापूर्वी लेन नं. 4 मधून सुरू करण्यात आलेल्या सेवेस प्रवाशांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
पुणे रेल्वे स्टेशनहून रातराणी बससेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या ठिकाणी मागील काही दिवसात प्रवाशांची संख्या वाढल्याने भोसरी आणि निगडी या दोन बसची संख्या वाढवण्यात येणार आहे.
– अनंत वाघमारे, वाहतूक विभाग व्यवस्थापक, पीएमपी
रातराणी बस मार्ग आणि वारंवारिता
रामोशी गेट स्वारगेटमार्गे- 30 मिनिटांनी
हडपसर पुलगेट वेस्टएन्ड मार्गे -25 मिनिटांनी
एनडीए गेट शिवाजीनगर-डेक्कन-वारजेमार्गे -45 मिनिटांनी
वाघोली येरवडा-चंदनगरमार्गे -1 तास 30 मिनिटे
भोसरी शिवाजीनगर-बोपोडी-कासारवाडीमार्गे- 1 तासाने
निगडी शिवाजीनगर-बोपोडी-पिंपरीमार्गे – 45 मिनिटांनी