सिनेवर्तुळात अफेअर्सची वानवा नाही. बहुतेक नायिकांचे नाव कुणा ना कुणाशी तरी जोडले गेलेले असतेच! यातील काही जोड्या हिटही होतात. दीर्घकाळ त्यांची चर्चा माध्यमांमधून होत राहते. त्याकाळात हे प्रेमीयुगुलही मनातल्या मनात आनंदी होत असते. पण काही कारणांनी जर ब्रेकअप झाले तर मात्र सगळीच गणितं बदलतात.
विशेषतः नायिकांना अशा वेळी त्रास सहन करावा लागतो. खास करुन माध्यमांमधून अनेकदा त्यांचा उल्लेख एखाद्या नायकाची “एक्स गर्लफ्रेंड’ असा केला जातो तेव्हा तो त्यांच्यासाठी जाचणारा ठरतो. हरलीन सेठीने याविषयीच एका पोर्टलला खडेबोल सुनावले आहेत. अभिनेता विकी कौशल आणि हरलीनचे मेतकूट होते, ही गोष्ट लपलेली नाही.
View this post on Instagram
काही कारणांनी त्यांचे बिनसले. पण विकीसोबतच्या डेटिंग आणि ब्रेकअपच्या बातम्यांनी मला त्रास होत नाही, असे हरलीन सांगते. मुळात, मला हरलीन म्हणून ओळखले जाणे जास्त महत्त्वाचे वाटते. त्याऐवजी एखाद्याची एक्स गर्लफ्रेंड म्हणून माझा उल्लेख होतो तेव्हा माझा पारा चढतो.
अलीकडेच एका ऑनलाईन पोर्टलने हरलीनचा एक व्हिडिओ प्रदर्शित केला आहे आणि त्याच्या हेडलाईनमध्ये तिचा उल्लेख विकीची एक्स गर्लफ्रेंड असा केला आहे. यावरुन हरलीनने या पोर्टलच्या संबंधितांना खडेबोल सुानवले आहेत. हरलीनच नव्हे तर कुठल्याच नायिकेला असे संबोधणे आवडणार नाही ! त्यामुळे हरलीनचा त्रागा समजण्याजोगा आहे.