पुणे, -शहरात शनिवारी नव्याने 5 हजार 705 करोना बाधित सापडले. तर 2 हजार 338 जण करोनामुक्त झाले. शहरातील बाधित संख्येत दररोज वाढत होत असताना दिसत आहे.
त्यामुळे सक्रीय बाधित संख्या आता 31 हजार 338 वर पोहचली. मात्र, रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे आरोग्य विभागाला दिलासा मिळाला आहे.
दिवसभरात 19 हजार 174 संशयितांची नमुने तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 5 हजार 705 बाधित सापडले. सध्या 22 बाधित व्हेंटिलेटरवर असून, 204 जणांना ऑक्सिजन लावण्यात आलेला आहे. करोनामुळे दिवसभरात दोघांच्या मृत्युची नोंद झाली आहे.