नगर (प्रतिनिधी) – नगर जिल्ह्यात अवघ्या दोनच दिवसांत तब्बल आठ हजार नवे करोनाबाधित आढळले आहेत. त्यात शनिवारी 4 हजार 219 व रविवारी 3 हजार 822 नवीन रुग्णांची संख्येत भर पडली. नगर शहरासह जिल्ह्यात आत्तापर्यंत तब्बल 1 लाख 83 हजार 8 जणांना करोनाचा संसर्ग झाला असून, बरेे झालेल्या रुग्णसंख्येचा आकडही जास्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, काल (शनिवारी) नगर जिल्ह्यात 3 हजार 753 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 53 हजार 559 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 85.66 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 4219 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या आता 23 हजार 670 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 757, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 2747 आणि अँटीजेन चाचणीत 715 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 56, अकोले 42, जामखेड 109, कर्जत 02, कोपरगाव 45, नगर ग्रामीण 69, नेवासा 58, पारनेर 60, पाथर्डी 45, राहता 59, राहुरी 27, संगमनेर 115, शेवगाव 03, श्रीगोंदा 31, श्रीरामपूर 21, कँटोन्मेंट बोर्ड 11, मिलिटरी हॉस्पिटल 01 आणि इतर जिल्हा 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 671, अकोले 65, जामखेड 09, कर्जत 28, कोपरगाव 129, नगर ग्रामीण 359, नेवासा 138, पारनेर 137, पाथर्डी 102, राहाता 234, राहुरी 104, संगमनेर 239, शेवगाव 66, श्रीगोंदा 61, श्रीरामपूर 225, कँटोन्मेंट बोर्ड 52 आणि इतर जिल्हा 123 आणि इतर राज्य 05 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 715 जण बाधित आढळुन आले. मनपा 90, अकोले 10, जामखेड 08, कर्जत 06, कोपरगाव 83, नगर ग्रामीण 48, नेवासा 10, पारनेर 51, पाथर्डी 16, राहाता 62, राहुरी 112, संगमनेर 23, शेवगाव 13, श्रीगोंदा 171, श्रीरामपूर 06 आणि इतर जिल्हा 06 अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 869, अकोले 232, जामखेड 55, कर्जत 293, कोपरगाव 146, नगर ग्रामीण 334, नेवासा 120, पारनेर 154, पाथर्डी 107, राहाता 299, राहुरी 215, संगमनेर 216, शेवगाव 119, श्रीगोंदा 109, श्रीरामपूर 199, कॅन्टोन्मेंट 166, मिलिटरी हॉस्पिटल 09, इतर जिल्हा 108 आणि इतर राज्य 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.