मुंबई – केंद्रिय मंत्री नीर्मला सीतारामन यांनी भारतीय जनता पक्षाचा बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा आज जाहीर करताच राजकीय नेत्यांसह अनेकांनी या जाहीरनाम्यावर सडकून टीका केली आहे. या जाहीरनाम्यातले पहिलेच कलम हे बिहारी जनतेला कोव्हिड-19 प्रतिबंधक लस मोफत देण्याचा वायदा केला आहे.
This song is just like the Vaccine https://t.co/FiwoCIlV2X
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) October 22, 2020
यावर दिग्दर्शक अनुराग कश्यपने याने प्रतिक्रिया दिली. त्याने ट्विट करत या जाहीरनाम्यावर सडकून टीका केली आहे. अनुराग कश्यपने ट्विट केले आहे की, ‘वादा तेरा वादा’ या गाण्याची व्हिडाओ लिंक सेंड करत मोदी सरकारवर उपरोधिक टोला लगावला आहे.
दरम्यान, बिहार निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्याचं हे ट्विट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. तत्पूर्वी, विरोधी पक्षाकडून या जाहीरनाम्यावर भाजपवर टीका केली आहे.