“आधी अँटीजनटेस्ट, मगच मिळणार प्रवेश”; मराठवाड्यातील ‘या’ जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचे आदेश

बीड : देशात दुसरी लाट जरी ओसरली असली तरी सगळ्यांना तिसऱ्या लाटेची भीती आहेच. दरम्यान, तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी सर्व राज्यातील प्रशासन आपापल्या परीने उपाययोजना करत आहे. त्यातच मराठवाड्यात सध्या तिसऱ्या लाटेने प्रवेश करू नये यासाठी अगोदरच खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.

बीड जिल्हा आरोग्य प्रशासन खडबडून कामाला लागले आहे. अन्य बाधित जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांचे जिल्ह्याच्या बॉर्डरवर चेक पोस्ट उभारून अँटिजेन टेस्टिंग करून मगच प्रवेश देण्यात यावा, तसेच याची अंमलबजावणी आजपासूनच करावी असे निर्देश पालकमंत्री मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका असल्याची चर्चा आहे. त्यामुळे लहान मुलांसाठी स्वतंत्र कोव्हिड सेंटर उभे करण्यात आले आहे. त्यासाठी खाटा, ऑक्सिजन आणि परिपूर्ण मनुष्यबळाची सोय करण्यात आली आहे. मुलांना उपचारासोबतच मनोरंजन म्हणून खेळणी, पुस्तके, सायकलिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. कोव्हीड काळात मुलांचे संगोपन करण्यासाठी 40 परिचरिकांना विशेष ट्रेंनिग देखील देण्यात आली आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही जिल्ह्यात निर्बंधांमध्ये शिथीलता देण्यात आली आहे. परंतु बीड जिल्ह्यात रुग्णांचा पॉझिटिव्ह रेट जास्त असल्याने नियम शिथीलता मिळालेले नाही. जिल्ह्यात रुग्ण वाढीचा दर कमी व्हावा यासाठी कडक उपाय योजना करण्यात याव्यात तसेच नागरिकांनी घालून दिलेल्या मर्यादांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

आष्टी, पाटोदा शिरूर तालुक्यात बाधित रुग्णांचे प्रमाण अधिक असून, यावर उपाय म्हणून पोलीस खात्याच्या मदतीने नगर व अन्य बाधित जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांचे जिल्ह्याच्या बॉर्डरवर चेक पोस्ट उभारुन अँटिजेन टेस्टिंग करून मगच प्रवेश देण्यात यावा, तसेच याची अंमलबजावणी आजपासूनच करावी असे निर्देश पालकमंत्री मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.