पुणे – रिअल इस्टेट डेव्हलपरमधील एक अग्रगण्य कंपनी असलेल्या एएनपी कॉर्पच्या वतीने ७ एप्रिल रोजी वंचित समुदायाच्या समर्थनार्थ एएनपी रन पुणे रन अर्धमॅरेथॉनचे आयोजन केले आहे. पुढील महिन्यात ७ एप्रिल रोजी ही स्पर्धा पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी परिसरातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील मैदानावर पार पडणार आहे.
धर्मादायाच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणारी ही शर्यत रनबडीजच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणार आहे. वंचित समुदायातील लोकांना आरोग्य सेवेमध्ये महत्वपूर्ण मदत करताना त्यांच्या निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या शर्यतीसाठी होणाऱ्या प्रत्येक नोंदणी शुल्काचा उपयोग हा एएनपी केअर फाऊंडेशनच्या वतीने अशा वंचित समुदायासाठी वापरला जाईल, अशी माहिती एएनपी कॉर्पचे संचालक ऋषी अडवाणी यांनी दिली.
IPL 2024 : प्रतीक्षा संपली…! अखेर उर्वरित आयपीएल सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, लोकसभा निवडणुकीमुळे…
या उपक्रमातंर्गत २१ कि.मी. अर्ध मॅरेथॉन, १० कि.मी., ५ कि.मी. फन रन, ३ कि.मी. फन रन आणि वॉक अशा विविध शर्यती होणार आहेत. सहभाग घेणाऱ्या प्रत्येकाला टी-शर्ट, पदक, गुडी बॅग, टायमिंग चिप, नाश्ता, हायड्रेशन, रुट सपोर्ट आणि ई-प्रमाणपत्रासह सर्व आवश्यक साहित्य पुरवले जाणार आहे, असे एएनपी कॉर्पचे संचालक सौरभ अडवाणी व तनुज फेरवाणी म्हणाले.