जिल्ह्यातील रुग्णांची संख्या १७
सातारा : जिल्हा रुग्णालयात दाखल असणारा युवक करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या १७ झाली आहे. आज दिवसभरात मंगळवारी हा तिसरा रुग्ण पाँझिटिव्ह आला आहे.
क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात दाखल असलेल्या बाधित रुग्णाचा निकट सहवासातील २१ वर्षीय तरुणाचा रिपोर्ट आला असून तो कोविडबाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
दरम्यान, कोरोना विषाणूचे रूग्ण वाढतच असताना एक दिलासादायक बातमी आहे. केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, एका दिवसात ७०५ रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. तर, आतापर्यंत देशात ३ हजार २५२ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकारपरिषदेत मंगळवारी सांगितले कि, देशात मागील १४ तासांत १ हजार ३६६ कोरोना संक्रमित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या १८ हजार ६०१ वर पोहचली आहे. तर २३ देशातील ६१ जिल्ह्यात मागील १४ दिवसात कोणताही कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही अशी माहिती त्यांनी दिली.