एका दिवसात ७०५ रुग्ण कोरोनमुक्त

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचे रूग्ण वाढतच असताना एक दिलासादायक बातमी आहे. केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, एका दिवसात ७०५ रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. तर, आतापर्यंत देशात ३ हजार २५२ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकारपरिषदेत मंगळवारी सांगितले कि, देशात मागील १४ तासांत १ हजार ३६६ कोरोना संक्रमित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या १८ हजार ६०१ वर पोहचली आहे. तर २३ देशातील ६१ जिल्ह्यात मागील १४ दिवसात कोणताही कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, आयसीएमआरकडे  रॅपीड टेस्टमध्ये काही त्रूटी असल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहे. पुढील दोन दिवस  रॅपीड टेस्टचा वापर करू नये. देशात आतापर्यंत ४ लाख ४९ हजार चाचण्या करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तर, सोमवारी ३३ हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.