मुंबई – अभिनेता एजाज खानच्या पाठोपाठ आणखी एका टीव्ही अभिनेत्याचे ड्रग्ज कनेक्शन आता समोर आले आहे. गौरव दीक्षित असे या त्याचे नाव असून, त्याने थेट लोखंडवालामधील फ्लॅटमध्ये ड्रग्ज पॅकिंगची कंपनीच सुरू केली होती, अशी माहिती समोर आली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्याच्या फ्लॅटवर छापा टाकला मात्र, त्यापूर्वीच तो गर्लफ्रेंडसह फरार झाल्याची माहिती मिळाली आहे.
ड्रग्ज कनेक्शनचा तपास करताना एनसीबीाला गौरव दीक्षित याचे नाव समजले होते. त्यानंतर त्याच्या लोखंडवालामधील फ्लॅटवर छापा मारला. मात्र गौरवला कदाचित याबाबत आधीच माहिती मिळाल्याने तो गर्लफ्रेंडबरोबर आधीच फरार झाला होता.
गौरव फरार झाला असला तरी अंधेरीतील लोखंडवाला येथील त्याच्या फ्लॅटमधून मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज आणि पॅकिंग मशीनसह इतर साहित्य मिळाले आहे. गौरवने या फ्लॅटवर ड्रग्ज पॅकिंगची कंपनीच सुरू केल्याचं त्यावरून स्पष्ट होत आहे.