अमरावती – करोनाच्या संकटांमुळे विविध क्षेत्रांचे नुकसान झाल्याचे आपण पाहिले आहे. त्यातच शाळा देखील बंद असल्याने स्कुलव्हॅन चालकांवरही उपासमारीची वेळ आली आहे. यातून मार्ग काढत एका स्कुलव्हॅन चालकाने आपल्या व्हॅनमध्येच उसाचे गुऱ्हाळ सुरू करत आपल्या उपजीविकेची सोय केली आहे.
करोनाच्या धोक्यामुळे गेले वर्षभर शाळा बंद आहेत. शाळा कधी सुरू होणार याबाबतही अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे स्कुलव्हॅन चालकांवरही गंडांतर आले आहे. अमरावतीत राहणात असलेल्या सचिन बहादूरकर यांनी यातून मार्ग काढून आपल्या उपजीवीकेचा प्रश्न सोडवला आहे.
शाळा जरी बंद अल्या तरी सचिनने कर्जावर घेतलेल्या व्हॅनचे बॅंकेचे हफ्ते मात्र, भरावेच लागत असल्याने त्याच्यावर आभाळच कोसळले. बॅंकेत चकरा मारत त्यांना विनंती करूनही काही उपयोग झाला नाही. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने त्याने काही उस विक्रेत्यांच्या सहकार्याने अखेर गुऱ्हाळ सुरु केले. सुरूवातीला त्याच्या या कृतीची खिल्ली उडवली गेली मात्र, आता तोच सचिन अन्य स्कुलव्हॅन चालकांसाठी आदर्श बनला आहे.