Crime | ठाण्यातील मनसे नेत्याची हत्या करणाऱ्या शूटरला लखनऊमध्ये अटक

ठाणे – ठाण्यातील मनसे पदाधिकारी जमील शेख यांची दुचाकीवरुन गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. संबंधित आरोपीला लखनऊच्या स्पेशल टास्क फोर्सने अटक केली.

टास्क फोर्सने अटक केल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. या आरोपीचे नाव इरफान सोनू शेख मनसुरी असे असून यानेच दुचाकीवर मागे बसून जमील शेख यांच्यावर गोळी झाडली होती. आरोपी मनसुरीला लखनऊ कोर्टातून ठाणे गुन्हे शाखा युनिट 1 च्या ताब्यात दिलं जाणार आहे. त्यानंतर त्याला सोमवारी (5 एप्रिल) ठाणे कोर्टात हजर केलं जाणार आहे.

मनसे पदाधिकारी जमील शेख यांची 23 नोव्हेंबर 2020 रोजी दुचाकीवर आलेल्या दोघांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. ठाण्याच्या राबोडी परिसरात संबंधित घटना घडली होती. राबोडी येथे त्यांच्या दुचाकीजवळ त्यांचा मृतदेह आढळला होता. त्यावेळी तेथील स्थानिकांनी दुचाकीचा अपघात झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असा दावा केला होता. पण पोलिसांनी याप्रकराची सखोल चौकशी केली असता त्यांची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले.

या प्रकरणातील मुख्य आरोपी अजून पोलिसांच्या हाती आलेला नाही. मुख्य आरोपीने अटक केलेल्या आरोपींना दोन लाखांची सुपारी दिली होती. घटनेनंतर तो फरार झाला होता. त्याचाच शोध पोलीस घेत आहेत. आरोपीने जमील यांची सुपारी का दिली याबाबतची माहिती पोलिसांनी अद्याप दिलेली नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.