जम्मू – भारतीय सुरक्षा दलांनी शनिवारी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचा आणखी एक नापाक डाव उधळला. त्या कारवाईत दोन सशस्त्र पाकिस्तानी घुसखोर मारले गेले. मागील 9 दिवसांत सतर्क भारतीय दलांनी घुसखोरीचे 3 डाव हाणून पाडले आहेत.
गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या आधारे भारतीय लष्कर आणि पोलिसांनी घुसखोरांविरोधात विशेष मोहीम राबवली. पूँच जिल्ह्यातील नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत असणाऱ्या भागातून भारतीय हद्दीत शिरकाव करण्याचा प्रयत्न तीन सशस्त्र घुसखोरांनी केला.