नवी दिल्ली – लाल समुद्रामध्ये हौथी बंडखोरांकडून पुन्हा एकदा दोन जहाजांवर क्षेपणास्त्रांचा हल्ला करण्यात आला आहे. ही दोन्ही जहाजे लायबेरियाची असून त्यातील पहिला हल्ला शुक्रवारी बाब अल-मान्देन खाडीमध्ये झालेल्या हल्ल्याच्या काही तास आगोदर झाले होते, असे यूएस सेंट्रल कमांडने म्हटले आहे.
शुक्रवारी एमएससी अलान्या या जहाजाला सकाळी ७ वाजता हौथींकडून हल्ल्याचा इशारा दिला त्यानंतर या जहाजाने आपला मार्ग बदलला. नंतर हौथींनी या जहाजाला दक्षिणेकडे जाण्याचा इशारा देण्यासाठी क्षेपणास्त्र डागले होते. अमेरिकेच्या नौदलाकडून या हल्ल्याला प्रत्युत्तर दिल्यावर अलान्या जहाज उत्तरेकडे मार्गस्थ झाले. हे जहाज आता सुरक्षित असल्याचे मानले जाते आहे.
त्यानंतर थोड्याच वेळाने ९ वाजता एल जसराह या आणखीन एका जहाजावर ड्रोन हल्ला झाला. या ड्रोन हल्ल्यामुळे या जहाजावर आग लागली. / जहाजावरून धोक्याचा संदेश प्राप्त झाल्यावर अमेरिकेच्या नौदलाने प्त्युत्तराची तयारी केली. दरम्यान जहाजावर लागलेली आग विझवली गेली होती.
दुपारी १ वाजता हौथी बंडखोरांनी आंतररा,ट्रीय सागरी मार्गावर दोन क्षेपणास्त्रे सोडली. त्यामुळे एनव्ही पॅलेटियम ३ या जहाजाला आग लागली. या हल्ल्याला प्र्त्युत्तर देण्यासाठी अमेरिकेची विनाशिका घटनास्थळी रवाना झाली.हौथी बंडखोरांनी डागलेले दुसरे क्षेपणास्त्र जहाजाला लागले नाही.
इस्रायलकडून गाझामध्ये हल्ल् सुरू असेपर्यंत लाल समुद्रातून जाणार् या कोणत्याही देशाच्या जहाजांना लक्ष्य केले जाईल, अशी धमकी येमेनस्थित हौथी बंडखोरांनी पूर्वी दिली होती. दिनांक ९ डिसेंबरपासून हौथी बंडखोरांनी लाल समुद्रातील जहाजांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा करायला सुरुवात केली आहे.
अमेरिकेच्या विनाशिकेने हौथी ड्रोन पाडली
लाल समुद्रामध्ये हौथी बंडखोरांनी डागलेली अनेक ड्रोन अमेरिकेच्या विनाशिकेने पाडली आहेत, अशी माहिती यूएस सेंट्रल कमांडच्यावतीने देण्यात आली. /एसएस कार्ने या विनाशिकेने हौथी बंडखोरांनी येमेनमधून डागलेली किमान १४ ड्रोन पाडली आहेत, असे या सेंट्रल कमांडने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. बाब एल-मान्देन खाडीतील जहाजांवरहौथी बंडखोरांकडून हे ड्रोन हल्ले केले जाऊ लागले आहेत.