दुबई – हौथी बडखोरांनी मारा केलेले एक जहाज आज लाल समुद्रामध्ये बुडाले. गेल्या काही दिवसांपासून हे जहाज पाण्यावर तरंगण्याच्या प्रयत्नात होते. लाल समुद्राच्या मार्गे प्रवास करणार् या व्यापारी आणि मालवाहू जहाजांना हौथींकडून लक्ष्य केली जाऊ लागल्यामुळे युरोप आणि अमेरिककडून प्रतिक्रीया म्हणून उलट कारवाई सुरू केली गेली आहे.
हौथी बंडखोरांनी इस्रायलविरोधातल्या आपल्या भूमिकेतून लाल समुद्रातल्या जहाजांवर सुरू केलेल्या हल्ल्यांमुळे पूर्णपणे नष्ट झालेले हे पहिले जहाज ठरले आहे. बुडालेले जहाज बेलिझे ध्वज असलेले रुबीमर नावाचे जहाज होते.
दिनांक १८ फेब्रुवारीला लाल समुद्र आणि एडनच्या आखाताला जोडणाऱ्या बार्ब अल मन्देब खाडीमधून जात असताना या जहाजावर हौथींनी क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. हे जहाज बुडाल्याच्या वृत्ताला येमेनमधील आंतरराष्ट्रीय मान्यता असलेल्या सरकारने आणि स्थानिक लष्करी अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.
मध्यपूर्वेतील जलवाहतुकीचे नियोजन करणाऱ्या ब्रिटीश संस्थेनेही रुबेमर जहाज बुडाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या जहाजाच्या बैरुतस्थित व्यवस्थापनाशी संपर्क केला जाऊ शकला नाही.
कर्मचाऱ्यांनी सोडून दिले होते जहाज…
हौथींनी क्षेपणास्त्रांचा मारा केल्यापासून या जहाजाने लाल समुद्रातच प्रवास थांबवला होता. गेल्या १२ दिवसांपासून जहाजावरील सर्व कर्मचार् यांनी जहाज सोडून दिले होते. हा जहाज सुरक्षितपणे जवळच्या किनार् यापर्यंत नेण्याचे प्रयत्न सुरू होते.
या जहाजावरून खतांची मालवाहतूक केली जात होती. खते आणि तेलाच्या गळतीमुले सागरी जीवसृष्टीचे मोठे नुकसान होईल, असा इशारा अमेरिकेच्या लष्करी सेंट्रल कमांडने दिला होता.