कमल हसन यांची कन्या श्रुती हसनपाठोपाठ आता आणखी एक श्रुती बॉलीवूड इंडस्ट्रीत दाखल झाली आहे. तिचं नाव आहे श्रुती शर्मा. बॉलीवूडसाठी श्रुती नवी असली तरी मनोरंजनाच्या क्षेत्रात ती नवी नाही.
गठबंधन या मालिकेत साकारलेल्या धनक पारेख या व्यक्तिरेखेमुळे श्रुती घराघरात पोहोचलेली आहे. त्याचबरोबर यापूर्वी इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्स या शोमध्येही ती सहभागी झालेली होती. आता पगले या चित्रपटातून ती डेब्यू करत आहे. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर आणि गुनीत मोंगा करत आहेत, तर दिग्दर्शनाची कमान उमेश बिस्ट यांच्याकडे आहे. हा एक हलकाफुलका मनोरंजक चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे.
View this post on Instagram
याविषयी बोलताना श्रुती सांगते की, या चित्रपटाची कहाणी लखनौवर आधारलेली आहे. हा स्रीप्रधान चित्रपट असून त्यामध्ये अनेक ख्यातनामक कलाकार आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी याहून चांगली संधी मला मिळाली नसती. श्रुतीने टीव्हीवर काम करण्यापूर्वी तेलगु चित्रपटातही भूमिका केल्या आहेत. एजंट साई श्रीवासा अत्रेया या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत होती. मध्यंतरी, श्रुतीला नागिन 4 मध्ये महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखेसाठी विचारणा करण्यात आली होती. पण तिने साफ नकार दिला.