पुणे – शहरातील करोनाचा प्रादुर्भाव तब्बल दीड महिन्यानंतरही सुरूच आहे. रविवारी (दि. 3) शहरात नव्याने 99 करोनाबाधित सापडले आहेत. दरम्यान, शहरातील बाधितांची एकूण संख्या 1 हजार 817 वर जावून पोहोचली आहे. दरम्यान, आज दिवसभरात 55 जणांना घरी सोडण्यात आले आहे, अशी
माहिती रोग्य विभागाकडून देण्यात आली. मागील आठ दिवसांपासून शहरात करोना विषाणूंचा प्रादुर्भाव सुपरफास्ट वाढत आहे.
शहरातील विविध रुग्णालयांत एकूण 1 हजार 152 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 75 जणांची प्रकृती चिंताजनक असून, ससून रुग्णालय, भारती हॉस्पिटल, सिम्बायोसिस, नायडू यासह खासगी रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, आजपर्यंत 433 जणांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 10 हजार 753 जणांची तपासणी करण्यात आली असून, त्यातील 10 हजार 29 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 1 हजार 573 जणांना विलगीकरण कक्षात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.