पुणे – शहरात करोनाने होणाऱ्या मृत्यूंचा आकडा वाढतच असून, 24 तासांत करोनामुळे 65 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुणे शहर हद्दीतील 42, तर ग्रामीण आणि अन्य जिल्ह्यांतील 23 जणांचा समावेश आहे. शनिवारी नव्याने 1,909 बाधित सापडले आहेत.
शहरातील चाचण्यांची संख्या कमी-अधिक होत असली तरीही बाधितांची संख्या दोन हजारांच्या घरातच आहे. शनिवारी दिवसभरात 6 हजार 626 संशयिताची तपासणी करण्यात आली. तर आतापर्यंत तब्बल 5 लाख 21 हजार 249 जणांच्या तपासणी अहवालातून 1 लाख 17 हजार 679 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
शनिवारी दिवसभरात 1,464 बाधित बरे झाले असून, आतापर्यंत 97 हजार 489 बाधित करोनामुक्त झाले आहेत. शहरातील सक्रीय बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या 17 हजार 442 बाधित सक्रिय असून, त्यातील 910 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
सध्या 473 बाधितांना व्हेंटिलेटर लावण्यात आले आहे, तर 437 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.