करोनामुक्त होण्याच्या प्रमाणात घट

आठ दिवसांत एक ते दीड टक्‍क्‍याने प्रमाण घटले

 

पुणे – मागील आठ दिवसांपासून पुणे विभागात बाधित संख्या वाढली आहे. तर बरे होणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे करोनामुक्‍त होणाऱ्यांचे प्रमाण एक ते दीड टक्‍क्‍यांनी घटले आहे.

 

दरम्यान, विभागात रुग्ण संख्येने 3 लाखांचा टप्पा पार केला असून, त्यामध्ये एकट्या पुणे जिल्ह्यात 2 लाख 15 हजार 975 बाधित संख्या आहे. तर आतापर्यंत 2 लाख 34 हजार 421 बाधित करोनामुक्‍त झाले.

 

आठ दिवसांपूर्वी विभागात करोनामुक्‍त झालेल्यांचे प्रमाण 75 टक्‍क्‍यांहून अधिक होते. मात्र, शविारी ते 74 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आले. विभागातील पुणे, सोलापूर जिल्ह्यांत मृत्युचा कहर सुरू असून, आतापर्यंत 8 हजार 173 बाधितांचा मृत्यू झाला.

 

जवळपास 2.59 टक्‍के मृत्यूचे प्रमाण आहे. दरम्यान, विभागात सक्रिय बाधितांची संख्या 73 हजार 266 इतकी आहे. आजपर्यंत विभागामध्ये एकूण 14 लाख 20 हजार 261 नमुने तपासणी केली. अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. विभागातील जिल्हानिहाय बाधित, करोनामुक्त आणि अन्य परिस्थितीचा आढावा.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.