- ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील रुग्णसंख्येत वाढ
वडगाव मावळ – मावळ तालुक्यात करोना बाधित रुग्णांनी संख्या 1884 झाली आहे. तालुक्यात शुक्रवारी (दि. 28) 30 रुग्णांची भर पडली. शहरी भागात 20 व ग्रामीण भागात 10 रुग्ण आढळले. शुक्रवारी ग्रामीण भागात रुग्ण संख्या कमी झाली आहे. आतापर्यंत 76 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरी भागात 989 व ग्रामीण भागात 895 रुग्ण आहेत. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात रुग्ण संख्येत वाढ झाली आहे.
तळेगाव दाभाडे शहरात सर्वाधिक 649 रुग्ण आहेत. लोणावळा 216 व वडगाव नगरपंचायत 124 रुग्ण आहेत. शुक्रवारी तळेगाव दाभाडे शहरात 20 करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. लोणावळा नगरपरिषद व वडगाव नगरपंचायत हद्दीत आज एकही रुग्ण सापडला नाही. कामशेत 2, ओझर्डे 2, वराळे, इंदोरी, सुदुंबरे, सावंतवाडी, काले, महागाव प्रत्येकी 1 असे एकूण 30 करोना “पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळून आले. मावळात रुग्ण संख्येचा आलेख उतरता आहे.
मावळ तालुक्यात आतापर्यंत 76 मृत्यू झाले. मावळ तालुक्यात शुक्रवारी (दि. 28) 15 रुग्णांना घरी सोडण्यात आले. 428 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहे. गृहविलगीकरण रुग्ण एकही नाही. यामध्ये 16 रुग्ण गंभीर असून, चिंताजनक रुग्ण एकही नाही. आतापर्यंत मावळ तालुक्यात 1380 रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.