आमदार राहुल कुल : हिवरेत वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे पुरस्कार प्रदान
गराडे – अनेक कार्यकर्ते पक्षनिष्ठा पायी आयुष्यभर कार्यरत राहतात; परंतु आपल्या परिसराच्या विकासासाठी आग्रही राहत नाहीत. कार्यकर्त्यांनी परिसराच्या विकासासाठी सातत्याने जागृत राहिले पाहिजे. सर्वसामान्य माणसाला कार्य केंद्रबिंदू मानून कार्यकर्त्यांनी कार्य करावे, असे आवाहन आमदार राहुल कुल यांनी केले.
हिवरे (ता. पुरंदर) येथे वसंतदादा पाटील प्रतिष्ठान आयोजित लोकनेते स्व. शिवाजीआप्पा पोमण यांच्या स्मरणार्थ आदर्श कार्यकर्ता पुरस्कार नीरा गावचे सामाजिक कार्यकर्ते राजेश वसंतराव चव्हाण व माजी सरपंच दत्तात्रय कामठे यांच्या स्मरणार्थ हरगुडे गावचे सरपंच भूषण रवींद्र ताकवले यांना आदर्श सरपंच पुरस्कार आमदार राहुल कुल यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार अशोक टेकवडे, श्यामकांत भिंताडे, गंगाराम जगदाळे, रेखा चव्हाण, तनुजा शहा, ईश्वर बागमार, भानुकाका जगताप, संतोष एकनाथ जगताप, अॅड. नितीन कुंजीर, अॅड. स्वप्नील होले,
हेमंत ताकवले, चांगदेव कुंजीर, संदीप देवकर, मोहन जगताप, संदीप चिकणे, गणेश मेमाणे, राजुशेठ शहा, बाळासाहेब जगताप, राजेंद्र धुमाळ, म्हस्कू कामठे, समीर तरवडे, अशोक दळवी, सुदर्शन कुदळे, नंदू गायकवाड, शंकर कुदळे, चंद्रकांत गायकवाड, विनय दगडे, समीर जाधव, दिलीप थोपटे, राजेंद्र काकडे, सागर करवंदे, पोपट झेंडे, दत्ता राऊत, प्रितम भोसले, स्वप्निल कांबळे, मारुती कामठे, अशोक कामठे, नवनाथ बोरावके, बाळासाहेब काळाणे, अरुण खेनट, विक्रांत सस्ते, नंदकुमार चव्हाण आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम.के.गायकवाड व शब्बीर शेख यांनी, सूत्रसंचालन विकास भोसले यांनी, आदर्श कार्यकर्ता परिचयपत्र वाचन दत्तात्रय गायकवाड व रोहिणी गायकवाड यांनी तर सुनिता रायुडू यांनी आभार मानले.
जालिंदर कामठे म्हणाले ज्यांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवून समाजाची नियमित सेवा केली. त्याची आठवण ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. शिवाजी पोमण व दत्तात्रय कामठे यांचे अनुक्रमे कार्यकर्ता व सरपंच म्हणून अप्रतिम कार्य होते. या दोघांचेही अलिकडे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे समाजाची फार मोठी हानी झाली. त्यांच्या स्मरणार्थ यावर्षी पासून आदर्श कार्यकर्ता व आदर्श सरपंच पुरस्कार समारंभ सातत्याने घेतला जाईल.
– जालिंदर कामठे, कार्यक्रमचे संयोजक, अध्यक्ष, वसंतदादा पाटील प्रतिष्ठान