पुणे – हळद एक आयुर्वेदिक औषध ही मसाल्यांच्या पदार्थांमधील एक प्रमुख घटक आहे. कारण हळदीशिवाय अनेक भारतीय पदार्थ तयारच होऊ शकत नाहीत. एवढंच नाही तर भारतीय आयुर्वेद शास्त्रातदेखील हळदीला अगदी महत्त्वाचं स्थान आहे.
हळदीमध्ये अँटीबॅक्टेरिअल, अँटीऑक्सीडेंट, अँटीफंगल, अँटीसेप्टीक, अँटीईंफ्लामेटरी, अँटीडायबेटीक हे गुणधर्म असतात त्यामुळे हळद त्वचेसाठी अतिशय गुणकारी आहे. असे काही हळदीचे गुणकारी फायदे तुम्हाला सांगणार आहोत…
जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स आणि काळेडाग असतील तर तुम्ही, दोन चमचे हळद आणि चमचाभर दूध एकत्र करून एक जाडसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून वीस मिनीटांनी चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ करा. महिन्यातून किमान दोनदा हा उपाय करा. त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स आणि काळेडाग कमी होण्यास मदत होईल.
तुमची त्वचा मऊ व मुलायम होण्यासाठी हा उपाय नक्की करा. हळदीमध्ये दूध, बेसन व मध टाकून एकजीव मिश्रण करा. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा सुकल्यावर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा. या फेसपॅकमुळे त्वचा मऊ व मुलायम होते. नितळ सौंदर्य प्राप्त होते.
हळद, ताजी साय, गुलाबपाणी यांचा फेसपॅक चेहऱ्यावर लावा आणि काही मिनीटांनी थंड पाण्याने चेहरा धुवून टाका. चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो येण्यासाठी मदत होते.
बेसन, दही, हळद व पाणी एकत्र करून चेहऱ्यावर लावा. सुकल्यावर चेहरा धुवून टाका असे नियमित केल्यास तुमचा चेहरा नितळ आणि फ्रेश दिसेल. चेहऱ्यावर उजळपणा येईल.
हळदीत थोडी मध घालून ते मिश्रण चेहऱ्यावर लावा. त्वचा हेल्दी, कोमल आणि उजळ होईल.