मुंबई – राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) संघर्ष सुरु असताना ओबीसी (OBC) समाजाने देखील एल्गार सभा सुरु केल्या आहेत. अशात आता समाजसेवक अण्णा हजारे (Anna hajare) हे देखील सक्रिय झाले आहेत. अण्णांनी केंद्र आणि राज्य सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. (Anna hajare active))
सरकारविरोधात जनतेसाठी आंदोलन करणारे ‘अण्णा हजारे’ लवकरच नव्या आंदोलनासाठी सक्रिय होणार आहेत. राज्य आणि केंद्र सरकारविरोधात अण्णा राळेगणसिद्धी (RaleganSiddhi) हे आंदोलन करणार आहेत. 19 नोव्हेंबर रोजी हे आंदोलन होणार आहे.
राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळावा, देशातील सैनिकांचे भविष्य अधांतरी असू नये, यासह सैनिकांच्या मुलांना शिक्षण मोफत देण्यात यावे, या मागणीसाठी राज्यातील माजी सैनिक सरकार विरोधात आंदोलन करणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व अण्णा हजारे करणार आहे. असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने प्रसारित केले आहे.
या आंदोलनामुळे देशभरातील सैनिक सरकार विरोधात राळेगणसिद्धीत एकटवणार आहे. त्यांना अण्णा हजारे मार्गदर्शन करणार आहे.अण्णा यांनी लोकपालसाठी केलेलं आंदोलन लक्षवेधी ठरलं होत. अण्णांच्या याच आंदोलनानंतर देशात काँग्रेसचं सरकार जाऊन भाजप सरकार आलं होत.