Maratha-Reservation : नांदेड जिल्ह्यात सोमेश्वर गावातील 9 वीत शिकणाऱ्या विध्यार्थीने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोमल तुकाराम बोकारे असे या विद्यार्थ्यांनीचे नाव आहे. इयत्ता 9 शिकणाऱ्या कोमल हिने स्वतःच्या घरात चिठ्ठी लिहून गळफास घेत आत्महत्या केली आहे.
“मराठा समाजाला आरक्षण लवकर द्यावे, माझा बलिदान व्यर्थ जाऊ नये, आई अण्णा मला माफ करा,” असे कोमलने सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवले आहे. नांदेड जिल्ह्यातील मराठा आरक्षणासाठी ही पाचवी आत्महत्या आहे. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या कोमलचे वडील हे अल्पभूधारक शेतकरी आहे. फक्त एक एकर शेती आहे. घरात एकुण पाच मुली आहे. दरम्यान, शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कोमलचे वडील करत आहे. अशात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोमलने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याने बोकारे कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
कोमलने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. ज्यात तिने म्हटले आहे की, “मराठा समाजाला आरक्षण लवकर द्यावं,माझं बलिदान व्यर्थ जाऊ नये, आई अण्णा मला माफ करा…”असे तिने चिट्ठीत लिहून ठेवले आहे.
मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन सुरु आहे, त्यातच मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणी साठी मराठवाड्यात सर्वाधिक आत्महत्या होत असल्याचे समोर येत आहे. एकट्या नांदेड जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी पाच आत्महत्या झाल्या आहेत.